आम्ही बालाजी फाऊंडेशन

शेतक-यांच्या कल्याणकारी एकजुटीतून नवी कृषी क्रांती घडविण्यासाठी ...

आम्ही बालाजी फाऊंडेशन

7/12 च्या सीमारेषांमध्ये विभागल्या गेलेल्या शेतक-यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आत्मनिर्भर करणे ही काळाची गरज आहे. शेतकरी जरी आज बांधांमध्ये विभागलेला दिसत असेल तरी त्याचा आत्मा एक आहे... तो कसत असलेली जमीन, ज्याला तो मातेसमान मानतो! भूमातेच या भूमिपुत्रांनी एकत्र येऊन नवे तंत्रज्ञान, नवे विज्ञान अवगत केल्यास, त्यासाठी आपसातली एकजूट वाढवल्यास आपल्या शेतात, आपल्या गावात, आपल्या राज्यात आणि पर्यायाने आपल्या देशात नवी कृषी क्रांती नक्कीच येणार! त्यासाठी पुढाकार घेत एका नव्या चळवळीची, नव्या मंचाची ही सुरूवात.

बालाजी फाऊंडेशनचे ध्येय आणि उद्दिष्टे

Card image

पारावरचा नवा वारा

  • शेतक-यांना गरजेनुसार तांत्रिक माहिती देणे. वेळोवेळी तंत्र सहाय्य उपलब्ध करून त्यांचे जीवन सुखकर करणे.
  • कमी खर्चात जास्त उत्पन्न घेऊन, शेत मालाची प्रत सुधारणे, शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी प्रयत्न करणे.

Card image

शंका समाधान

  • हवामानाचा अचूक अंदाज घेऊन शेतीचे उत्पन्न वाढवणे. नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी शेतकरी मित्रांना सज्ज करणे.
  • हमी भाव देणारे उत्पन्न घेण्यासाठी शेतक-यांना प्रोत्साहीत करणे, त्यातून त्यांचे राहणीमान, जीवनमान उंचावणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे.

Card image

तंत्रज्ञानाची झेप

  • विविध विषयांवर चर्चासत्रे घडवून शेतक-यांना शिक्षित व प्रशिक्षीत करणे.
  • एकमेकां सहाय्य करू,अवघे धरू सुपंथ! या उक्तीला अनुसरून शेतकरी मित्रांची एकजूट साधणे.






Card image

धरूया विज्ञानाची कास

  • आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणे, शेतक-यांना ना नफा ना तोटा तत्वांवर भाड्याने उपलब्ध करून देणे!
  • तज्ञांचे सहकार्याने शेतक-यांच्या शंकांचे निरसन, आणि शेती समस्यांचे समाधान करणे.
  • शेतक-यांमधील प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देणे, त्यांच्या प्रयोगांना प्रसिद्धी देणे.

Card image

शासन दरबारी

  • सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने संपर्कात राहून शेतीचे वेळापत्रक डिजिटल करणे.
  • खरीप आणि रब्बीतील पिकांचे नियोजन, खते, कीटकनाशके आणि त्यांच्या फवारणीचे नियोजन, शेतजमिनीचे आरोग्य आणि मृदसंधारण, फळबागा, आंतरपीके यासारख्या विषयांवरील प्रात्यक्षिके, प्रशिक्षणे आणि चर्चासत्रांचे आयोजन कधी प्रत्यक्ष तर कधी ऑनलाईन कार्यक्रम घेऊन करणे.

Card image

सिंचन आणि जल व्यवस्थापन

  • सोयाबीनचे प्रती एकर उत्पादन वाढविण्यासाठी कार्यक्रम आयोजित करणे.
  • शेतकरी पाल्यांमधून सुशिक्षित शेतकरी घडविण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे.
  • शेतक-यांच्या कल्याणकारी एकजुटीतून नवी कृषी क्रांती घडविणे.